रोकोमैडॉर (फ्रान्स): 1300 वर्षांपासून दगडी खडकात जडलेली तलवार अचानक गायब झाली आहे. ही काही सामान्य तलवार नाही. असे म्हणतात की हजारो वर्षांपूर्वी एका देवदूताने ही तलवार रोमन सम्राटाला दिली होती. आज ते फ्रेंच एक्सकॅलिबर म्हणून ओळखले जाते. काही लोक याला दुरंदल तलवार असेही म्हणतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती फ्रान्सच्या अभिमानाशी संबंधित आहे. त्याचा शोध घेण्यात फ्रेंच पोलीस व्यस्त आहेत. दरम्यान, ही जादुई तलवार रोमवरून येत फ्रान्सच्या एका दगडात कशी अडकली, हे जाणून घेऊया.
डुरंडल तलवार फ्रान्समधील रोकोमैडॉर या ऐतिहासिक शहरात एका खडकात पुरण्यात आली होती. इतका वेळ गेल्याने तलवारीला गंज चढला आहे. पण तरीही ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. सुरक्षिततेसाठी ही तलवार साखळीने बांधलेली होती. मात्र, आता ही तलवार चोरीला गेली आहे.
तलवार कुठून आली?
डुरंडल तलवार रोमन सम्राट शारलेमेनला आठव्या शतकात एका देवदूताने दिली होती शारलेमेनने नंतर ही तलवार रोलँडला दिली, जो त्याचा सर्वात धाडसी आणि शूर सैनिक होता. बऱ्याच ठिकाणी रोलँडचे वर्णन सम्राट शारलेमेनचा पुतण्या असे केले आहे.
11 व्या शतकातील फ्रेंच महाकाव्य ‘द सॉन्ग ऑफ रोलँड’ मध्ये तलवारीची शक्ती आणि रोलँडच्या शौर्याबद्दल माहिती मिळते. ती तलवार खरोखरच जादुई होती असे सांगितले जाते. ती युरोपमधील सर्वात कुशल कारागीरानी बनवली होते. ती तलवार इतकी तीक्ष्ण होती की, एका वाराने दगडाचे दोन तुकडे होऊ शकत होते. असे म्हटले जाते की, ही तलवार अनेक पवित्र ख्रिश्चन अवशेष एकत्र करून जादूने तयार केली गेली होती. तलवार बनवताना संत पीटरचे दात आणि संत बेसिलचे रक्त यासारख्या गोष्टींचा समावेश होता. डुरंडलच्या साथीने रोलँडने शारलेमेनसाठी अनेकवेळा मोठे यश मिळवले. पण रोन्सेवॉक्सच्या युद्धात शत्रूंनी रोलँडवर मात केली. या युद्धाने तलवारीचे हजारो वर्षांचे भविष्य ठरवले.
अनेक रिपोर्ट्सनुसार रोन्सेवॉक्सच्या लढाईत रोलँडने 100,000 मुस्लिम सैन्याचा सामना केला. डुरांडलच्या मदतीने रोलँडने अनेक शत्रूंना ठार मारले आणि राजाच्या मुलाचा शिरच्छेद करण्यात यशस्वी झाला, असे म्हटले जाते. पण, तरीही शत्रू सैन्याने त्याच्यावर मात केली. अशा परिस्थितीत डुरांडल शत्रूच्या हाती पडू न देता तिला नष्ट करणे रोलँडने योग्य मानले. पण, ही एक जादूची तलवार होती. त्याने सर्व शक्तीनिशी एका मोठ्या दगडावर तलवार आदळून ती तोडण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही.
काही स्त्रोतांचे म्हणणे आहे की, मृत्यूपूर्वी रोलँडने तलवार आपल्या शरीराखाली लपविण्याचा निर्णय घेतला. तर, इतर कथांमध्ये असे सांगितले जाते की, नाइट रोलँडने त्याच्या शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपली तलवार हवेत फेकली. त्यानंतर तलवारीने शेकडो किलोमीटरचा प्रवास केला आणि रोकोमैडॉर या फ्रेंच शहरातील एका दगडावर कोरला गेला. हे कसे शक्य झाले, या प्रश्नाचे कोणतेही वाजवी उत्तर नाही. मात्र, रोकोमैडॉर शहरातील लोकांमध्ये या तलवारीला खूप महत्त्व आहे. या पौराणिक शस्त्राशी आपले नशीब जोडले गेले आहे, असा त्याचा विश्वास आहे. हा त्यांच्या परंपरेचा भाग आहे. त्यामुळे या तलवारीच्या चोरीने स्थानिक नागरिक प्रचंड नाराज झाले आहेत.