सोलापुर : सोलापुर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यातील २४ म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथे गुरुवारी (ता. ४) घडली आहे. दरम्यान, गावातील ओढ्यावरून जाणारी महावितरणची तार तुटून पाण्यात पडल्याने ही घटना घडली आहे. संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिक केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गुळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या २४ म्हशी होत्या. गुरुवारी (ता. ४) नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी भजनावळे गावाबाहेर निघाले होते. त्यावेळी गावाजवळील ओढ्यात विजेची तार तुटून पडल्याने ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता. याचा अंदाज पशुपालक भजनावळे यांना आला नाही.
त्यांना काही समजायच्या आतच पाण्यात उतरलेल्या म्हशींचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, भजनावळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी उर्वरित म्हशींना पाण्यात जाण्यापासून रोखले. त्यामुळे त्यांच्या चार म्हशींचा जीव वाचला.