मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है…’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री हिना खान ही स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. हिना नेहमी तिचे हेल्थ अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. आता हिनाने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. कॅन्सरमध्ये केमोथेरपी दरम्यान केस गळत असल्याने हिनाने तिचे लांब केस कापले आहेत.
या व्हिडीओबरोबर हिनाने एक पोस्टही लिहिली आहे. कॅन्सरमध्ये केमोथेरपीदरम्यान केस गळत असल्याने हिनाने तिचे लांब केस कापले आहेत. हिना या प्रसंगाला हसतमुखाने सामोरे गेली. पण, व्हिडीओच्या शेवटी तिच्या आईला हे पाहावले नाही. त्यामुळे लेकीला मिठीत घेत आई भावुक झाल्याची दिसून आली.
हिनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हिना ही खुर्चीवर बसलेली दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलं आहे की, मला माहितीय की हे खूप अवघड आहे. कसं वाटेल तुम्हाला तुमचे सगळ्यात आवडते केस असे काढून टाकावे लागले तर? जर तुम्हाला जिंकायचं असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. आणि मी जिंकणं निवडत आहे. हा व्हिडिओ पाहताना मात्र नेटकरी भावुक झाले आहेत. तिला अशा अवस्थेत पाहून नेटकरी तिला मजबूत राहायला सांगत आहेत.