नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार, UPI च्या माध्यमातून व्यवहार केले जात आहेत. त्यात आता जून 2024 मध्ये ‘युनिफाईड पेमेंट सिस्टिम’ म्हणजेच यूपीआयद्वारे 1,389 कोटी व्यवहार झाले आहेत. या कालावधीत एकूण 2,007 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
यूपीआयच्या माध्यमातून एका वर्षापूर्वी म्हणजेच जून 2023 मध्ये 934 कोटी व्यवहारांद्वारे 14.75 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. त्याचवेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत, वार्षिक आधारावर व्यवहारांची संख्या 49 टक्के वाढली आहे. याद्वारे हस्तांतरित केलेल्या रकमेत 36 टक्के वाढ झाली आहे. मे महिन्यात 20.45 लाख कोटींचे व्यवहार झाले. तर यूपीआयद्वारे 1,404 कोटी व्यवहार झाले आणि त्यातून 20.45 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या यूपीआयचे नियमन करणाऱ्या संस्थेने 1 जुलैच्या व्यवहाराची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये माहिती समोर आली आहे. भारतातील आरटीजीएस आणि एनईएफटी पेमेंट प्रणाली आरबीआयद्वारे चालवली जाते. त्यात IMPS, RuPay, UPI सारख्या प्रणाली ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनसीपीआय) द्वारे ऑपरेट केल्या जातात.