पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवीन कात्रज बायपासजवळ विचित्र अपघात घडला असून यात लक्झरी बस, कार आणि कंटेनर ट्रकसह ९ वाहने एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात १५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहिती नुसार, ही बस साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघाली होती. नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर दरी पुलावर हा अपघात झाला आहे. हा अपघात सोमवारी (ता. ७) रात्री ८ वाजण्याच्या सुमरास घडला आहे. या अपघातात वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंगचे कर्मचारी पोहचले आणि त्यांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.