पुणे : राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहे. कुठं जोरदार पाऊस होत आहे, तर कुठं मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टी भागासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकच्या घाटमाथ्यावर ढगांची दाटी आणि पावसाच्या जोरदार सरींची हजेरी असणार आहे. राज्यातील कोकणसह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
राज्यातील कोकण आणि घाटमाथा या भागात निश्चितच चांगला जोरदार पाऊस झाला. परंतु उर्वरित भागांमध्ये पावसाचे प्रमाण हे खूपच कमी होते. राज्यातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी पाहायला मिळाले. जुलै महिन्यात सरासरीच्या 106 टक्के एवढा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच या जुलै महिन्यात राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या सर्वत्र सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.