शिक्रापूर : केंदूर (ता. शिरूर) येथील वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा बबलू ऊर्फ अभिजित चक्रधर पहाड याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावानंतर अखेर त्याला एक वर्षासाठी ‘मोक्का’ कायद्यांतर्गत स्थानबद्ध केले. केंदूर येथील बबलू ऊर्फ अभिजित चक्रधर पहाड हा वारंवार खून, जिवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे, पिस्तूल बाळगणे यांसह आदी स्वरूपाचे गुन्हे वारंवार करत होता. तसेच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अशा गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. बबलू ऊर्फ अभिजित पहऱ्हाड याला ताब्यात घेऊन एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
गुन्हेगारांची यादी तयार
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या, नागरिकांना त्रास देणाऱ्या, ठेक्यातून वाद निर्माण करणे, कंपन्यांना त्रास देणे, खंडणी मागणे, बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या अनेक गुन्हेगारांची यादी सध्या तयार करण्यात आली असून त्यांच्यावरदेखील मोक्का, तडीपारी यांसह आदी स्वरूपाच्या कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले.