सासवड : महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी (ता.२७ नोव्हेंबर) येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मराठी साहित्य संशोधन परिषद व अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन
करण्यात येते.
खानवडी (ता.पुरंदर) येथे रविवार (ता.२७) होणाऱ्या १५ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ॲड. शिवाजी कोलते यांची निवड करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
सासवड येथील वकील व बांधकाम व्यावसायिक ॲड. शिवाजी कोलते हे पिसर्वे गावचे रहिवासी असून सासवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत, यापुर्वी त्यांनी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद भूषविले आहे, राजकीय व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो,
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मराठी साहित्य संशोधन परिषद व अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते
दरम्यान, सकाळी ११ वा. संमेलनाचे उदघाटन होणार असून, दुपारी २ वा. समाजसुधारक महात्मा फुले या विषयावर परिसंवाद होणार आहे, मी सावित्री बाई बोलतेय, नाट्य प्रयोग, कथाकथन, कविसंमेलन व पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.
संमेलनाचे संयोजन करण्यासाठी आयोजित बैठकीला राजाभाऊ जगताप,सुनील धिवार, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड रवींद्र फुले, दत्ता होले , रमेश बोरावके, विजय तुपे, प्रा सुरेश वाळेकर, दिपक पवार, संजय सोनवणे, अमोल भोसले आदी उपस्थित होते.