LPG Cylinder Price : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. LPG सिलेंडरच्या किमतीत आज बदल करण्यात आले आहेत. एलपीजी सिलिंडरचे दर 30 ते 31 रुपयांनी कमी झाले असून आज १ जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, एलपीजी दरातील ही कपात किरकोळ असून ती 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी आहे. या कपातीमुळे व्यावसायिक एलपीजी वापरकर्ते म्हणजेच, रेस्टॉरंट मालक आणि ढाबा मालकांना स्वस्त सिलिंडर मिळतील. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
जाणून घ्या तुमच्या शहरात एलपीजी सिलिंडर च्या किमती
राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1646 रुपयांवर पोहोचला आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1676 रुपये प्रति सिलेंडर होती.
कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1756 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर 1787 रुपये होती.
मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1598 रुपयांवर पोहोचला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर 1629 रुपये होती.
चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1809.50 रुपये झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1840.50 रुपये प्रति सिलेंडर होती.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही
घरगुती 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घ्या त्यांचे दर?
- दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना
- कोलकाता येथे घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना
- मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडर 802.50 रुपयांना
- चेन्नईमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर 818.50 रुपयांना