Monday, May 19, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर येथील एका “बोगस” पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल, पोलिस असल्याचा रूबाब दाखवत टँकर चालकाकडून उकळली अडीच लाखाची खंडणी

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Saturday, 29 June 2024, 19:07
alleged journalist and his two collogues looted tanker driver in hadapsar Pune

पुणे : हडपसर परिसरातील एका बोगस पत्रकाराने पोलीस असल्याचे भासवून ऑईलने भरलेल्या टँकर चालकाकडे 10 लाखांची खंडणी मागत तडजोडअंती त्याच्याकडून अडीच लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कथित पत्रकार व त्याच्या दोन साथीदारांवर हडपसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. 28) पहाटे अडीच ते सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापुर महामार्गावर कवडीपाट टोल नाक्याजवळ वरील प्रकार घडला आहे.

राहुल मच्छींद्र हरपळे (वय- 35, रा. फुरसुंगी ता. हवेली) असे बोगस पत्रकाराचे नाव आहे. बाळू आण्णा चौगुले (वय- ४४, धंदा चालक, चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी राहुल हरपळेसह त्याच्यासमवेत असलेल्या त्याच्या दोन अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2 गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू चौगुले यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, त्यांच्या तेलवाहू टॅंकरवर अब्दुल शेख हे चालक म्हणुन काम करतात. शुक्रवारी पहाटे अब्दुल शेख हे टँकर घेऊन कवडीपाट टोलनाक्यावरून जात असताना, लाल रंगाच्या स्विफ्टमधून आलेल्या तिघांनी टँकर अडविला. गाडीतून उतरलेल्या तिघांनी आपण पोलिस असल्याचे सांगत, अब्दुल शेख यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच टँकरच्या मालकाला बोलव, अन्यथा केस करण्याची धमकीही दिली. अब्दुल शेख यांनी याबाबतची माहिती बाळू चौगुले यांना फोनवरुन कळवली. त्यानंतर बाळू चौगुले व त्यांचा मित्र सुदीप अवघडे अडीच वाजण्याच्या सुमारास कवडीपाट टोलनाक्याजळ पोहोचले.

टोलनाक्याजवळ पोहचताच, बाळू चौगुले यांनी स्विफ्टमधील दोघांची भेट घेतली. तसेच टँकर अडवून ठेवण्याचे कारण विचारले असता, तुमच्या टँकरमधून फर्नेस ऑईलची वाहतूक केली जात असून, त्यासाठी तुमच्यावर केस करण्यात येईल, असे स्विफ्टमधील दोघांनी चौगुले यांना सांगितले. यावर घाबरलेल्या चौगुले यांनी केस न करण्याची विनंती करताच, टँकर सोडण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. तसेच दहा लाख रुपये न दिल्यास चौगुले यांना जिवे मारण्याचीही धमकी देण्यास सुरुवात केली. धमकीमुळे घाबरलेल्या चौगुले यांनी दहा लाखाच्या ऐवजी अडीच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. मात्र, पैसे जवळ नसल्याने तासाभराची सवलत मिळावी, अशी विनंती केली. यावर स्विफ्टमधील दोघांनी चौगुले यांना ९२८४६६११४४ हा मोबाईल नंबर देऊन, दोघेही निघून गेले.

दरम्यान तासाभरानंतर पैसे जमा होताच, चौगुले यांनी आपल्या मोबाईल फोनवरुन ९२८४६६११४४ या नंबर फोन करत अडीच लाख रुपये घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर चौगुले यांनी संबधित अॅपवर पाहणी केली असता, सदर नंबर हा राहुल हरपळे याच्या नावावर असल्याचे दिसून आले. तसेच राहुल हरपळे हा पोलिस नव्हे, तर न्युज प्रहार या बोगस युट्युब चॅनेलचा कथित पत्रकार असल्याचे चौगुले यांच्या लक्षात आले. मात्र, भितीपोटी चौगुले यांनी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राहुल हरपळे व त्याचा मित्र सुदिप अवघडे यास गुलमोहर मंगल कार्यालयाजवळ अडीच लाख रुपये नेऊन दिले. तसेच ही बाब हडपसर पोलिसांत जाऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. वरीष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन, राहुल हरपळे व त्याच्या दोन सहकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला.

राहुल हरपळे याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल..
खंडणी, दारु विक्री, दारु वाहतूक यासारखे आणखी काही गुन्हे राहुल हरपळे आणि त्याच्या पत्नीवरही हडपसर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर हडपसर भाजी मार्केटमधील एकाला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याच्या नावाखाली लुटल्याचा गुन्हाही हरपळे याच्यावर दाखल आहे.

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीतील माजी विद्यार्थ्यांची तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा

Monday, 19 May 2025, 19:54

सोन्याचे दागिने व रोख रकमेसह हरवलेली पर्स येरवडा पोलिसांच्या कार्यतप्तरतेमुळे महिलेला मिळाली परत

Monday, 19 May 2025, 19:51

‘या’ पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस धिंगाणा घालणार; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज

Monday, 19 May 2025, 19:37

घोड धरणात पाणीसाठा 0.80 टक्केच; रांजणगाव एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी…

Monday, 19 May 2025, 18:11

कदमवाकवस्ती येथे 36 वर्षीय मजुराचा आढळला मृतदेह

Monday, 19 May 2025, 17:49

लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात काम करताना महिला कर्मचाऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू; विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची सुरक्षा राम भरोसे..

Monday, 19 May 2025, 17:37
Next Post
Excise policy case Arvind Kejriwal sent to 14-day judicial custody of CBI

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाचा मोठा धक्का, न्यायालयीन कोठडीत रवानगी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.