लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी चौकात मिनी बस, कंटेनर व टेम्पो यांच्यात अपघात झाला असून हा अपघात सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मिनी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर एमआयटी चौकात कंटेनर हा पुणे बाजूकडून सोलापूरच्या बाजूला अचानक वळण घेत असताना सोलापूरच्या बाजूला जाणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळला. त्यातच कंटेनरच्या पाठीमागे असलेली मिनी बस ही कंटेनर पाठीमागून जोरात धडकली. यावेळी मोठ्या प्रमानात नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी गर्दी केली होती.
दरम्यान, काही वेळ सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांची एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.