नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शेफाली वर्माने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शेफालीने द्विशतक झळकावले. 20 वर्षीय शेफाली महिला कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावणारी खेळाडू ठरली आहे. तिने वीरेंद्र सेहवागने 16 वर्षांपूर्वी केलेल्या खेळीची आठवण करून दिली. सेहवागने चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्धही एवढ्याच चेंडूंत द्विशतक झळकावले होते.
एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात शफाली वर्माने अप्रतिम फलंदाजी केली. तिने194 चेंडूत द्विशतक झळकावले, ज्यात त्याने 22 चौकार आणि 8 षटकार मारले. तिने113 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शेफालीने उपकर्णधार स्मृती मानधनासोबत पहिल्या विकेटसाठी २९२ धावांची भागीदारी केली, तर दुसऱ्या विकेटसाठी एस शुभासोबत 33 धावा आणि जेमिमा रॉड्रिग्जसोबत 86 धावांची भागीदारी केली. शेफालीने 66 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 113 चेंडूत शतक केले. शेफालीने 158 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या.