पुणे : आजवर तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव कळत नव्हते परंतु आता तुम्हाला नाव स्पष्टपणे मोबाईलवर दिसणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने टेलिकॉम कंपन्यांना यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी मुंबई आणि हरयाणा या ठिकाणी ट्रायल सुरू केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही चाचणी यशस्वी झाली आहे.
आता येत्या 15 जुलैपासून संपूर्ण देशभरात कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनपी) नावाची ही सुविधा सुरू होईल. यामध्ये सिम कार्ड खरेदी करताना केवायसी फॉर्मवर भरलेल्या व्यक्तीचे नाव मोबाईलवर दिसणार आहे. स्पॅम, फ्रॉड कॉल आणि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे.
स्पॅम कॉलला बसणार आळा
इनकमिंग कॉलवेळी नंबरसह कॉल करणाऱ्याचे नावसुद्धा दिसणार आहे. सीएनपी सेवा पंपनीच्या सध्याच्या कॉलर आयडी ऑप्लिकेशनसारखीच आहे. देशात स्पॅम कॉल ही मोठी समस्या बनली आहे. एका सर्व्हेनुसार, 60 टक्के लोकांना दिवसभरात तीन तरी स्पॅम कॉल येतात.