गयाना (वेस्ट इंडिज): इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार बटलरने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी समालोचक रवी शास्त्री यांनी भारतीय कर्णधार रोहितला विचारले की, नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने काय निर्णय घेतला असेल? यावर रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असे सांगितले. भारतीय कर्णधार रोहितनेही प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली.