सुरेश घाडगे
परंडा : परंडा येथे होणाऱ्या सकल मराठा मोर्चासाठी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या महामोर्चासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी काल महामोर्चा मार्गाची व सभा स्थळाची पाहणी केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे, पोलीस उपनिरिक्षक विक्रांत हिंगे आदि उपस्थित होते .
त्यानुसार उद्याच्या मोर्चासाठी पोलीस अधीक्षकांसह ३ पोलीस उपविभागीय अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक, २४ पोलीस उपनिरीक्षक, ७५ महिला पोलीस, २०० पोलीस कर्मचारी असा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.
सकल मराठा आरक्षण महामोर्चा मंगळवार दि .८ रोजी सकाळी १० वा . छत्रपती संभाजी महाराज चौक येथून प्रारंभ होत आहे. नाथ चौक, संतसेना महाराज चौक-खासापुरी चौक, महाराणा प्रताप चौक – बावची चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मार्गे कोटला मैदान- रुई रोड सभा मंच स्थळ या ठिकाणी पोहचणार आहे.