हडपसर : घरी कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या मांजरी ग्रीन (ता. हवेली) येथील सदनिका फोडून रोकड व दागिन्यांसह जवळपास १४ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मांजरी ग्रीन सोसायटीत राहायला आहेत. महिला आणि कुटुंबीय कामानिनित्त बाहेरगावी गेले होते गावावरून घरी आल्यानंतर फिर्यादी यांना घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. घराचा दरवाजा उघडून घराची पाहणी केली असता बेडरूम मधील कपाटामधील व बेडमधील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तसेच घरातील रोकड, सोन्याचे दागिने असा १३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज आढळून आला नाही.
दरम्यान, चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.