मुंबई : आजपासून (दि.27) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. 14 व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभा पाय-यांवर विरोधक आंदोलन करत असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात येताच त्यांच्यासमोर विरोधकांनी आक्रमक घोषणाबाजी केली. यावेळी शेतक-यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतक-यांची वीजबिल माफ करावी, शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
आजपासून सुरु होणा-या अधिवेशनाचा समारोप 12 जुलैला होणार आहे. 14 व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे