पावसाळा सुरु होताच अनेक संसर्गजन्य आजारांची मालिका सुरु होते. ताप, सर्दी, खोकला हे आजार तर होतातच शिवाय डेंग्यूसारखे जीवघेणेही आजार बळावण्याची शक्यता निर्माण होते. योग्य उपचार सुरू करण्यासाठी आणि गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी वेळेवर निदान करून घेणे महत्वाचे ठरते.
डेंग्यू हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. हा डेंग्यूचा डास जर चावला तर सांधे आणि स्नायू दुखणे, पुरळ, मळमळ, उलट्या, उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, आणि थकवा यांसारखे त्रास सुरु होतात. हे सर्व त्रास साधारणत: डास चावल्यानंतर 4 ते 10 दिवसांनी होतो. पण या डेंग्यूची चाचणी केव्हा करावी हा प्रश्न अनेकांना पडतो.
जर तुम्हाला डेंग्यूचा ताप असल्याची किंवा लागण झाल्याची शंका आल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा. तुमची लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि तुम्ही कुठे बाहेरगावी गेले असल्यास त्या माहितीवरून तुम्हाला चाचणी करावी लागेल. डेंग्यूच्या तापासंदर्भात अचूक माहितीसाठी रक्त तपासणी करावी लागते.
या रक्त तपासणीनंतरच डेंग्यूचा संसर्ग झालाय की नाही याची माहिती तुम्हाला मिळू शकते. संसर्गापासून रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकार शक्तीने काही अॅंटीबॉडीज् तयार केल्या आहेत का हे देखील पाहिले जाते.
Dr Sushant Shinde
Consultant Physician and Diabetologist