पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, यवतमाळच्या जिल्हा परिषदेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
यवतमाळच्या जिल्हा परिषदेत वकील आणि कायदा सल्लागार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला यवतमाळ येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 16 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद प्रशासकीय ईमारत पहिला माळा, आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ ४४५००१ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://zpyavatmal.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वकील आणि कायदा सल्लागार.
– एकूण रिक्त पदे : 16 पदे.
– नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र.
– शैक्षणिक पात्रता : एल.एल.बी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2024.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 23 जुलै 2024.