पुणे : केमसेवाडी (ता. मुळशी) येथील याच्या खुनाचा उलगडा करण्यात पौड पोलिसांना यश आले असून याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
दिनेश वर्मा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर महेशकुमार सान्डे (वय- १९, रा. सध्या रा. केमसेवाडी, ता. मुळशी, जि. पुणे मुळ गाव राजसेवैया खुर्द पिथौरा, महासमुन्द, छत्तीसगढ़) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.१३) केमसेवाडी (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायत हद्दीत अंदाजे २५ ते ३० वयोगटातील एका तरुणाचा हात व पाय बांधून खून करण्यात आला होता. व त्याचा मृतदेह हा येथील शेतात टाकून देण्यात आला होता. याप्रकरणी सोनाली आनंद केमसे रा. सदर यांनी पौड पोलीस ठाण्यात खबर दिली होती.
सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, व पथकाला विविध माहिती देऊन तपास करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार सदर पथक तपास करीत असताना कौशल्यपूर्ण तपास करून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, केमसेवाडी येथुन एक इसम १० ते १२ दिवसापासुन बेपत्ता आहे. व त्याचे नाव दिनेश वर्मा असुन तो एका ठिकाणी घराचे बांधकाम करण्यासाठी मिस्त्री म्हणुन काम करीत होता.
दरम्यान, दिनेश वर्मा व महेशकुमार सान्डे हे एका ठिकाणी काम करत होते. परंतु दिनेश वर्मा हा मागील १० ते १२ दिवसापासुन कामावर नाही. त्यामुळे महेशकुमार सान्डे याचेकडे चौकशी केली असता दिनेश वर्मा हा त्याचे सोबत वारंवार अनैसर्गिक कृत्य करत होता या कारणास्तव त्याने त्यास जिवे ठार मारल्याची कबुली दिली. त्याला तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे.
सदराची कामगिरी पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, भालचंद्र शिंदे, विनायक देवकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, पोलीस हवालदार रावत, इनामदार, जगदाळे अर्जुन, काळे, कासले, सोनवणे यांनी केली असून तपासकामी सोनाली केमसे पोलीस पाटील केमसेवाडी व स्थानिक नागरीक सेवा यांनी मोलाचे सहकार्य केले.