Women Health : आपण रोज बघत असतो आपल्या आजूबाजूला आपली आई, बायको, बहिण, मैत्रीण या महिला आपल्या स्वत:पेक्षा आपल्या घरातील लोकांची काळजी घेत असतात. स्वताकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ सुद्धा नसतो. महिला कित्येक वेळेस आपल्या आरोग्याबाबत बेजबाबदार असल्याचं दिसून येतात. पण महिलांनी लक्षात घेणं गरजेच आहे की, वाढत्या वयासोबत येणाऱ्या म्हातारपणाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे चाळीशीनंतर आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यावी? हे जाणून घेऊ..
आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे
वाढत्या वयाबरोबर आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: ज्या महिला ज्या दिवसभर आपल्या घरातील कामे करताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्हालाही दीर्घायुष्य हवं असेल आणि वृद्धापकाळाचा तुम्हाला त्रास होऊ नये, तर ही खालील माहिती जरूर वाचा.
१)व्यायाम
घरच्या कामात कितीही व्यस्त असलात तरी व्यायामासाठी थोडा वेळ काढणे फार ग्ररजेचे आहे. तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्ही यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही वेळ निवडू शकता. तुम्ही योगा आणि चालण्याच्या माध्यमातून वृद्धापकाळातही स्वत:ला निरोगी ठेवू शकता.
२) आहारात प्रोटीनची काळजी घ्या
निरोगी आयुष्यासाठी आहारातील प्रोटीनच्या गरजांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील त्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही दररोज एक वाटी दुग्धजन्य पदार्थ आणि कोरड्या फळांचा आहारात समावेश करू शकता.
३) आहारात दुधाचा समावेश करा
तुम्हाला दूध प्यायला आवडत असो किंवा नसो, त्याच्या सेवनाने हाडांची घनता मजबूत होऊ शकते. दुधाशी मैत्री करून आणि त्याचा आहारात समावेश करून तुम्ही तुमची हाडे दीर्घायुष्यासाठी मजबूत ठेवू शकता.
४) फळे आणि भाज्या खा
ऋतूनुसार येणाऱ्या भाज्यांचा आहारात समावेश केलाच पाहिजे. अशात, जर तुम्ही ते खात नसाल तर ही सवय बदलणे खूप महत्वाचे आहे. याच्या मदतीने शरीरातील पोषक तत्वांची पुरेशी काळजी घेतली जाऊ शकते.