Laxman Hake : “आरक्षण खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही,” म्हणत लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहे. फक्त कुणबी नोंदी असतील तर त्यांना कोणी रोखू शकत नाही. कुणबी हा वेगळा प्रकार आहे त्यांचे रितिरिवाज, वेगळे घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगाने देलेले आरक्षण, जरांगे पारावरच्या गप्पा मारतात. कोणी सांगितले लोहार, कुंभार ओबीसी मध्येच आहेत. व्हीजेएनटी ओबीसी आरक्षण एकच आहे. धनगर समाजाला कळकळीची हात जोडून विनंती आहे. धनगर समाजाला महाराष्ट्राला कळकळीची विनंती आहे. आम्ही धनगर समाजाचे नेते ओबीसीच्या चळवळीमध्ये झोकुन उतरलो आहोत. कारण प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर सर्वच नेते आता उतरलो आहे. आमची लढाई वेगळी आहे. आता तुम्ही ताटातले घेऊ नका.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले कि छगन भुजबळ यांच्यावर टीका करून कन्फ्युज करू नका. मुस्लिम समाज धर्म म्हणून पाहिले जाते, मुस्लिमांमध्ये सामजिक स्तर नाही, व्यवसाय बघून त्यांना सर्टिफिकेट दिले गेलेत. जी गोष्ट मिळणारच नाही, जी गोष्ट आडाटच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच राज्य आहे. सरकारचा खेद वाटतो, त्याच (जरांगे) तुम्ही मनोरंजन करत आहेत. सहकाराने राज्याचा बट्ट्याबोळ केला, सहकार विशिष्ट सामजाचा, मंडल आयोग महाराष्ट्रासाठी आहे का दादा ?देशासाठी आहे.
आरक्षणातील सर्वे 100% बोगस..
ओबीसीचा आरक्षनात अशाच जाती घातल्या, अशाच गेल्या ओबीसी असेच आले त्यांचा कुठला सर्वे झाला नाही. त्यांना खिरापत वाटली, त्यांना काही गरज होती का?? या पुढे असली मोघम वक्तव्य महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांनी करायचे नाहीत. आरक्षण खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही. आता दहा टक्के दिलेल्या आरक्षणातील सर्वे 100% बोगस आहे. असा लक्ष्मण हाके यांचा आरोप आहे.
मुळात आयोग गठित करण्याचा अधिकार हा शासनाला, पण त्याच्या स्वायत्त अधिकारात मात्र शासनाचा हस्तक्षेप होत होता. महाज्योती, वसंतराव नाईक महामंडळाला अनुदान मिळत नाही. त्यांचा मागणीचा हेतू राजकीय असू शकतो. 288 विधानसभा लढवून काय करणार? तुमचे आमदार कमी आहेत का? असेही लक्ष्मण हाके यांनी यावेळी म्हटले आहे.