पुणे : मान्सूनच्या पावसाने राज्य व्यापलं आहे. पुढील चार दिवस हे पावसाचे असणार आहेत. असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजून मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे. येणाऱ्या चार दिवसांत राज्यात हवामान कसे राहील आणि कुठे पाऊस पडेल यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत.
दरम्यान, पुढील चारही दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. २२ जून आणि २३ जून रोजी कोकण आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे पडणार पाऊस?
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील चारही दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर २५ जून रोजी सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच २२ जून रोजी कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.