तसेच कोणत्याही व्यक्तीला खोटे कुणबी दाखले दिले जाणार नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत समोरासमोर चर्चा व्हावी, अशी ओबीसी नेत्यांची भूमिका असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी जशी नेत्यांची उपसमिती आहे, त्याप्रमाणेच ओबीसी उपसमिती स्थापन केली जाणार आहे. मराठा समाजाला त्यांच्या विकासासाठी जेवढा निधी मिळत आहे, तेवढाच निधी आता ओबीसी समाजासाठीही देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती देखील भुजबळांनी दिली. तसेच जालन्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेले उपोषण मागे घ्यावे, यासाठी ओबीसी नेते जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.