पुणे : भांडगाव येथील ग्राम पुरोहित गोपाळ अवचट यांचे ज्येष्ठ चिरंजीव व सामाजिक कार्यकर्ते समीर गोपाळ अवचट यांचे आज गुरूवार दि. २० रोजी सकाळी ०८.३० च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. भांडगाव गावातील सर्व राजकीय, धार्मिक , सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले समीर अवचट, यांचे तरुण वयात अचानक जाण्याने भांडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा , मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे. समीर अवचट यांच्या पार्थिवावर आज दुपारी ०२.३० वा. भांडगाव येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.