पुणे प्राईम न्यूज डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. स्वत:च्या कामामुळे आणि त्यांच्या फॅशनमुळे त्यांनी समाजात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अमृता फडणवीस यांच्या फॅशनमुळे त्यांचा सोशल मीडियावर चाहता वर्ग मोठा आहे. त्यांची स्टाईल आणि फॅशन नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अमृता फडणवीस सध्या पुन्हा नव्या स्टायलिश लुकमुळे चर्चेत आल्या आहेत. नवीन लूक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
अमृता फडणवीस यांनी या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस घालून त्यावर हाय हिल्सही घातल्या आहेत. त्यामुळे त्यांचा लुक खूपच सुंदर दिसत आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा पार्टीसाठी तु्म्ही देखील असा ड्रेस कॅरी करू शकता. यामुळे तुम्हाला ग्लॅमरस लुक मिळण्यास मदत होईल. ऑनलाईन किंवा बाजारात तुम्हाल असा ड्रेस मिळू शकतो.
यावेळी अमृता फडणवीस यांनी मोठे कानातले घातले आहेत. हिऱ्यांच्या या कानातल्यांमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांचा प्रत्येक लुक असाच वेगळा असल्यामुळे त्या सुंदर दिसत आहेत. तुम्ही देखील अमृता फडणवीस यांच्यासारखा लूक करुन स्टायलिश दिसू शकता.