मुंबई : वसई हत्या प्रकरणाने राज्याला हादरवून सोडलं आहे. भरदिवसा तरूणाने आपल्याचं प्रेयसीला संपवलं. सर्व लोक आजूबाजूला बघत असताना हे घडल आहे. माणुसकीला काळीमा फासणारी हि घटना असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था कुठे आहे? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येप्रकरणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे..
राज्यात खळबळ उडवून देणारी घटना वसईमध्ये घडली. एका तरूणाने आपल्या प्रेयसीची हत्या केली आहे. आरोपी रोहित यादव याने आपल्याच प्रेयसीवर पान्याने वार करत तिची हत्या केली. हि हत्या भरदिवसा केली गेली. आरोपीला ना कायद्याचा धाक ना पोलिसांची भीती, कशाचीच तमा न बाळगता त्याने हे सार कृत्य केल. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी थेट राज्य सरकारवर टीका केली आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाने राज्यात ठिकठिकाणी बोंबाबोंब असल्याने गुन्हेगारी चौका-चौकात डोके वर काढताना दिसत आहे. यात खून होतोय तो माणुसकीचा. वसईत एका माथेफिरूने तरुणीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केली. ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. चिंतेची बाब म्हणजे ये-जा करणारे लोक फक्त बघ्याच्या भूमिकेत होते, हे अतिशय वेदनादायी आहे, असल्याचं वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.
कायद्याने गुन्हेगारीवर आपली पकड सैल केलीय म्हणूनच गुन्हेगारांना त्याचा जराही धाक राहिला नाही, ही बाब वारंवार समोर येत आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यात हे सरकार असक्षम ठरत आहे. गुन्हेगारी थैमान घालत असताना, सर्वसामान्य भीतीच्या सावटाखाली जगत असताना राज्याचे गृहमंत्री मात्र कुठे व्यस्त आहेत कुणास ठाऊक? असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
रोहित यादव आणि आरती यादव या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये काही तरी कुरबुरी होत्या. रोहितला संशय होता की आरतीचे बाहेर इतर दुसऱ्या कोणासोबत संबंध आहेत. आरतीच्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने ती गेल्या महिन्यामध्ये वसईमधील एका कंपनीमध्ये कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी रोजच्याप्रमाणे की कामावर निघाली असताना, गावराई पाडा येथील स्टेट बँके समोर त्याने आरतील अडवलं. दोघांमध्ये वाद झाला. मात्र काही वेळाने रोहितने आपल्या जवळील पान्ह्याने मागून येत, तिच्या डोक्यात गंभीर घाव घातले. तो इतक्या जोरात घाव घालत होता की आरतीचा जागेवरच मृत्यू झाला.