पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून, शेतकरी सुखावले आहेत. तर काही ठिकाणी मात्र पावसाने सुट्टी दिली आहे. विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवला असला, तरी राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची ओढ कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगला पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असे आव्हान सुद्धा करण्यात आल आहे.
राज्यभरात पावसाची ओढ
राज्यात पावसाने आठवडाभरापासून तापमानात वाढ होऊन पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्या आहेत. राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त 5.69 टक्के पेरण्या झाल्या असून, पावसाने अल्पविश्रांती घेतल्याने शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात पडले आहेत. मात्र, कृषी तज्ज्ञांकडून चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात अनेक भागात चांगला पाऊस झाला. खरीप पेरणीला वेग आल्याच चित्र आहे . मात्र, कृषी विभागाने पाऊस चांगला झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन केल्यानंतरही पेरणी करण्यासाठी शेतकरी मात्र घाई करत असल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबईत दमदार पावसाचा अंदाज
मुंबईत 18 जूनपासून मुसळधार पावसाचा इशारा ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला होता. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहिती 18 ते 25 जूनपर्यंत आठवडाभर, मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका
चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केलीये. मात्र सध्या पाऊस नियमित नाहीय. याबरोबरच अनेक ठिकाणी पावसात मोठा खंड पडताना दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये, असा सल्ला अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांनं राज्यातील शेतकऱ्यांना दिलाय.