मुंबई : सुप्रसिद्ध बॉलिवूड ज्येष्ठ गायिका अलका याज्ञिक यांची अनेक गाणी गाजली आहेत. तसेच अलका याज्ञिक यांनी अनेक रिअॅलिटी शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत ही काम केल्या आहेत. मात्र सध्या त्या कलाक्षेत्रापासून दूर असल्याचं कारण सांगितलं आहे.
ज्येष्ठ गायिका अलका याज्ञिक यांनी सोशल मीडियावरुन खूप मोठी बातमी शेअर केली आहे. अलका याज्ञिक यांनी त्यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह श्रवणशक्ती कमी झाल्याचे निदान झाले असल्याचे सांगितलं आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, यामुळेच त्या काही काळ सिनेविश्वापासून दूर होत्या.
यावेळी बोलताना त्यांनी असेही सांगितले की, ही मला माहिती कळताच मोठा धक्का बसला आणि त्या अजूनही त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर येताच त्यांचे चाहते काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.
अलका याज्ञिक यांनी म्हटले की, एका विमान प्रवासातून त्या बाहेर आल्या आणि त्यांना काही ऐकू येईनासं झालं असं त्यांनी म्हटले. हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे, सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं निदान डॉक्टरांनी केले आहे. कानात मोठ्याने आवाज सतत ऐकल्यामुळे हा आजार बळावला असं त्यांनी म्हटले. त्यामुळे मोठ्याने हेडफोनवर गाणी ऐकणं टाळा असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, “माझे सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स व हितचिंतक. काही आठवड्यांपूर्वी, जेव्हा मी फ्लाइटमधून उतरले तेव्हा मला अचानक जाणवले की मला काहीही ऐकू येत नाही. या घटनेनंतर काही आठवडे धैर्य दाखविल्यानंतर, मी आता माझ्या सर्व मित्रांसमोर व हितचिंतकांसमोर माझे मौन सोडू इच्छित आहे. मी इतके दिवस कुठे गायब होते याबाबत मी आज सर्वांना सांगणार आहे”. माझ्या डॉक्टरांनी मला विषाणूच्या हल्ल्यामुळे एक दुर्मिळ संवेदी मज्जातंतू श्रवणशक्ती कमी झाल्याचे निदान केले आहे. या अचानक झालेल्या आजाराने मला धक्का बसला आहे. या आजाराशी आणि त्यातून आलेल्या नव्या परिस्थितीशी मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे अलका याज्ञिक यांनी सांगितले.