नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने विविध बँकांवर मोठी कारवाई केली आहे. त्यातच आरबीआयने पूर्वांचल सहकारी बँकेचा परवानाच रद्द केला आहे. नियमांचं पालन न केल्यामुळे आरबीआयने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने विविध बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये सोनाली बँक पीएलसीला ९६.४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाला १.४५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं हा दंड ठोठावण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. रिझर्व्ह बँकेनं ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या वित्तीय स्थितीबाबत ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या सुपर अॅडव्हायझरी इव्हॅल्युएशनसाठी वैधानिक छाननी केली होती.
तसेच आरबीआयनं सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल दंड का आकारू नये, अशी विचारणा केली आहे. अशाच प्रकारे नियमांचं पालन न केल्यामुळे आरबीआयनं पूर्वांचल सहकारी बँकेचा परवाना रद्द केला.