मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला एका 25 वर्षीय तरुणाने यूट्युबवर व्हिडीओ अपलोड करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी बिश्नोई गॅंगच्या नावाने दिली होती. याच प्रकरणात गुन्हे शाखा अॅक्शन मोडवर आहे. यात आता एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Cyber Police registered an offence against an individual who, through a video on the YouTube channel “Are Chhodo Yar,” discussed the Bishnoi Gang and mentioned plans to kill actor Salman Khan.
Mumbai Crime Branch arrested the accused, Banwarilal Laturlal Gujar from Boarda… pic.twitter.com/x2aR7AKnkv
— ANI (@ANI) June 16, 2024
बनवारीलाल लातुरलाल गुजर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. याने एका युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करुन सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी राजस्थानमधून या आरोपीला अटक केली आहे. या व्हिडिओत लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा उल्लेख केला होता. आरोपीला अटक करुन काही वेळातच गुन्हे शाखेचे पथक मुंबईत दाखल होणार आहे.
मुंबई सायबर पोलीसांनी बनवारीलाल लातुरलाल गुजर या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्याने अरे छोडो यार नावाच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याने बिश्नोई गॅंगचा आणि सलमान खानला जीवे मारण्याचा प्लॅनचा उल्लेख केला आहे.
आरोपीला मुंबईत आणणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेने ANI ला दिली आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 506(2), 504, 34 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(D) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.