पुणे : ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल आज सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. या संदर्भात सीईटी सेलने माहिती जारी केली आहे.
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेसाठी तब्बल सात लाख 25 हजार 640 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निकाल जाहीर होताच प्रवेशप्रक्रियेला वेग येणार आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम), जीवशास्त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. संगणकावर आधारीत या परीक्षेचे आयोजन विविध सत्रांमध्ये केले होते. त्यामुळे परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्घतीने जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, सीईटी सेलतर्फे यापूर्वी निकालाची संभाव्य तारीख नमूद केलेली असताना सुधारित सूचना जारी करताना 19 जूनपूर्वी निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.