पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदार झालेले, पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ शपथ घेतल्यावर पहिल्यांदा पुण्यात आले आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यात आल्यावर त्यांनी पुरंदर विमानतळाबाबत एक विधान केलं आहे.
काही वर्षांपासून पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा केली गेली आहे. विमानतळासाठी जागा कोणती निश्चित करावी याचीत अदलाबदली झाली. बाकी यापुढे कोणतीही प्रशासकीय हालचाल बघायला मिळाली नाही. कागदावर असलेलं विमानतळ प्रत्यक्षात कधी होणार की वाट बघायला लावणार आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.
पुरंदरचे विमानतळ लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली. डीजीसीएने पुरंदर विमानतळला मान्यता दिली आहे. लवकरच जागेची पाहणी होणार असल्याची माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. शपथ घेतल्यावर पहिल्यांदा मोहोळ पुण्यात आले.
मला सकाळी जे. पी. नड्डा यांच्या पीएचा फोन आला, सांगितल की ११ वाजता पीएम हाऊसला बोलवलं आहे. मला विश्वास बसत नव्हता की खरच आहे की काय? स्वप्नवत होत. हे सगळं पीएम हाउसला गेल्यावर वेगळ वाटलं. मोदी म्हणाले की, कैसे हो पुणेकर सहकार आणि सिविल एविएशनची दोन खाती मिळाली. बिग बॉस बरोबर काम करायला मिळणार, पुण्याला एक नंबर करायच आहे. असेही मोहोळ यावेळी म्हणाले.