पुणे : दौंड तालुक्यातील कुणबी प्रश्नांबाबत दि. १४ रोजी सकाळी तहसील कार्यालय येथे वसंत साळुंखे व मराठा समाजाच्या वतीने उपोषण करण्यात करण्यात आले होते. निवेदनातील सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे लेखी आश्वासन तहसीलदार अरुण शेलार यांनी दिल्यांनंतर सायंकाळी उपोषण स्थगित करण्यात आले.
दौंड तालुक्यात २० हजारच्या आसपास कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्याची यादी त्या-त्या गावच्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करावी, कुणबी दाखले काढण्यासाठी येत असलेल्या जाचक अटी कमी कराव्यात ,त्यासाठी येणाऱ्या अडचणी मध्ये सुलभता आणावी, कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी तालुक्यातील सर्व सर्कल कार्यालयात आठवड्यातून एक दिवस कॅम्प आयोजित करावा, कुणबी दाखला मिळणेसाठी अर्जदाराने अर्ज दिल्यानंतर त्याच्या कागदपत्रांची पडताळणी तहसील कार्यालयाने त्यांच्या संकेत स्थळावर प्रसिध्द केलेली आहे.
कुणबी दाखले देण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा, गृह चौकशी व वंशावल जुळविण्यासाठी नेमलेल्या समितीची मुदत एक वर्ष ठेवावी या मागण्यांसाठी, जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत साळुंखे व सहकाऱ्यांनी दौंड तहसील कार्यालय येथे उपोषण सुरू केले होते.
यावेळी तहसीलदार अरुण शेला यांनी उपोषण स्थळी भेट देऊन निवेदनातील मागण्यांबाबत उपोश्न्कार्त्यांशी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून, ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. अशा नोंदी निदर्शनास आणून देण्यासाठी तलाठी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर मोहीम आखून, सदर नोंदी तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात सर्व याद्या आजच प्रसिद्ध करण्यात येतील. तालुक्यातील प्रत्येक मंडल अधिकारी कार्यालयात प्रत्येक आठवड्यात दर सोमवारी कुणबी प्रमाणात वाटपाचे शिबीर किमान तीन महिने घेण्यात येईल, कुणबी दाखले देण्यासाठी शासनाच्या दि. १८ जानेवारी २०२४ व ४ मार्च २०२४ च्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.
तसेच मोडी भाषेतील सर्व अभिलेख मराठी भाषेत सार्वजनिक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तहसिल कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल, वंशावळ जुळविण्यासाठी गठीत केलेल्या समतीचे कामकाज वर्षभर सुरू ठेवण्यात येईल. असे लेखी आश्वासन उपोषणकर्ते व मराठा समाजाला दिल्याने, सदरचे आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे वसंत साळुंखे यांनी सांगितले.
यावेळी नायब तहसिलदार ममता भंडारी, अविनाश गाठे, महेंद्र देसाई, वैभव कदम, आकाश गणेशकर, प्रमोद पवार, अंबादास काळे राजाभाऊ कदम, अमित पवार, पंकज नंदखिले, अजय जाधव, लक्ष्मण दिवेकर, श्रीराम यादव, दीपक दिवेकर, प्रदीप दिवेकर, संजय शिंदे, गोरख शितोळे, अमोल भोईटे, निरंजन ढमाले, स्वप्नील घोगरे, तुकाराम वाबळे, विशाल धुमाळ,कानिफ महाराज सूर्यवंशी ,कैलास शितोळे यांसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते