पुणे : दौंड कार्डलाईन एकेरी असल्याने पुण्याहून मनमाडचा दिशेने जाणाऱ्या गाड्यांना क्रॉसिंगसाठी पाटस जवळ थांबावे लागते. तर मनमाड हून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना काष्टीजवळ थांबावे लागते. एकच मार्ग असल्याने एखाद्या रेल्वेला तरी क्रासिंगसाठी थांबावे लागत आहे. याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे. रेल्वे प्रवाशांची सोय व्हावी यासाठी प्रशासनानं कॉर्ड लाईन दुहेरीकरणाचा प्रस्ताव मांडला आहे. दुहेरी लाईन झाल्यानंतर पुण्याहून मनमाडच्यादिशेने जाणाऱ्या आणि मनमाडकडून पुण्याच्यादिशेने येणाऱ्या 28 रेल्वेगाड्यांना, आता दौंड कॉर्ड लाईन जवळ थांबावे लागणार नाही.
यामुळे तब्बल 30 मिनिटांची बचत होणार आहे. अप आणि डाऊन झाल्यानंतर दोन्ही मर्गिकावरील गाड्या सुसाट धावतील.यासाठी सोलापूर रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून हे काम केले जाणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. दौंड कॉर्ड लाईनवर सध्या एकच फलाट उपलब्ध आहे .परंतु दुसरी मार्गिका झाल्यावर दुसऱ्या बाजूला देखील फलाट बांधण्यात येणार आहे.