निलंगा : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) निलंगा उपतालुकाप्रमुखपदी जगन्नाथ निळकंठ मनाळे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख व माजी आमदार दिनकरराव माने यांनी जगन्नाथ मनाळे यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे. जगन्नाथ मनाळे हे मागील १५ वर्ष शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रामाणिक आहेत. पक्षाशी एकनिष्ठ आणि विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे त्यांनी एकनिष्ठपणे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन शिवसेनेने त्यांची निलंगा तालुक्याच्या उपतालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. निलंगा तालुक्यातील सरवडी व मदनसूरी या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यानुसार, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नवख्या चेहऱ्यांना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली आहे. निवडीनंतर बोलताना वनिर्वाचित उपतालुकाप्रमुख जगन्नाथ मनाळे म्हणाले की, पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील प्रभू, जिल्हाप्रमुख व माजी आमदार दिनकरराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेच ठाकरे यांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी चोख पार पाडणार आहे. असे उपतालुकाप्रमुख जगन्नाथ मनाळे यांनी सांगितले आहे.