नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Motorola ने आपला बहुचर्चित, बहुप्रतिक्षित फ्लिप अर्थात फोल्डेबल असा फोन लाँच करण्याची तयारी केली आहे. Moto Razer 50 आणि Moto Ultra असे हे स्मार्टफोन्स आहेत. या व्हेरिएंटमधून कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे.
कंपनीने 1056×1066 पिक्सेल रिझोल्यूशनसह 3.6 इंच कव्हर ओएलईडी पॅनेल दिला आहे. त्याच्या मुख्य म्हणजे फोल्डिंग डिस्प्लेमध्ये 1080×2640 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. या फुल एचडी+ डिस्प्लेचा आकार 6.9 इंच आहे. फोनमध्ये दिलेला OLED डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्टसह मिळणार आहे. तसेच फोटोग्राफीसाठी कंपनी एलईडी फ्लॅशसह 2 कॅमेरे देणार आहे. यात 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेराही मिळणार आहे.
कंपनीने सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला आहे. फोनची बॅटरी 3950mAh असणार आहे. ही बॅटरी 33 वेंट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. बायोमॅट्रिक सुरक्षेसाठी कंपनी त्यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. यात 2.5GHz फ्रिक्वेन्सीसह ऑक्टा-कोर प्रोसेसर असेल. तर प्रोसेसर हा MediaTek Dimension 7300X असणार आहे. हा फोन येत्या 25 जूनला लाँच केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.