Kitchen Hacks : स्वयंपाकघरातील काही लहान लहान कामे अशी असतात जी हॅक्स वापरून तुम्ही पटकन पूर्ण करू शकता. त्यासाठी जास्त वेळ काढण्याची गरज नाही. या किचन ट्रिक्समुळे स्वयंपाकघरातील काही कामं अगदी सोपी वाटू लागतील. कुटुंबियांसाठी स्वयंपाक करत असताना महिलांना अनेक गोष्टींकडे लक्ष द्याव लागतं. त्यामुळे आज असे काही किचन हॅक्स जाणून घेऊ ज्याचा फायदा गृहिणींनी होईल…
स्वयंपाक घरातील कामं सोपे करणारे ट्रिक्स…
– भाजी बनण्यासाठी अधिक वेळ होत असेल तर, टोमॅटो टाकल्यानंतर मीठ घाला, ज्यामुळे कांदा आणि टोमॅटो शिजण्यास मदत होईल.
– पालेभाज्या लवकर खराब होतात. मग अशावेळी तुम्हाला जर त्या जास्त काळ टिकवायच्या असतील तर तुम्ही प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे भाज्या अधिक काळ ताज्या राहण्यास मदत मिळते.
– जर तुमच्या घरात टोमॅटो नसेल तर हा हॅक तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. स्पयंपाक घरात असलेले टोमॅटो संपले की ग्रेव्हीमध्ये टोमॅटो केचप किंवा सॉस वापरू शकता.
– खीर बनवण्यासाठी पातळ भांडी वापरू नका. पातळ भांडी वापरल्यामुळे खीर तळाला चिकटू लागते आणि खीरची चव खराब होते. म्हणून खीर बनवण्यासाठी जाड तळ असलेली भांडी वापरा.
– भाज्या कापण्यासाठी नेहमी लाकडी चॉपिंग बोर्ड वापरा. संगमरवरी स्लॅबवर भाजी कापल्याने चाकूची धार कमी होते ज्यामुळे आपलं काम वाढतं.
– घरी तयार असलेले आले, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी त्यात 1 चमचा गरम तेल आणि मीठ मिक्स करा.
– पावसाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले मीठ अनेकदा ओलाव्यामुळे खराब होते. अशा स्थितीत तांदळाचे दाणे मीठात घातल्यास तांदूळ मीठातील सर्व ओलावा शोषून घेतो आणि मीठ पूर्वीसारखे दाणेदार राहते.
– लसूण सोप्या पद्धतीने सोलण्यासाठी लसणाच्या पाकळ्या बंद बरणीत टाकून जोराने हलवा. बरणी उघडल्यावर तुम्हाला दिसेल की लसणाची साले स्वतःहून निघून गेली आहेत.