अरुण भोई
काळेवाडी : दौंड तालुक्यातील मलठण-काळेवाडी-बोरीबेल-आलेगाव रस्त्यावरील पुलाचे काम पुर्ण झाले आहे. याबाबत येथील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडे याबाबतीत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या पुलाचे काम शंभर टक्के झाले असून तो वाहतूकीसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी समाधानी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक शेतकरी, परिसरातील प्रवासी, वाहतुकदार यांची अडचण लक्षात घेऊन सातत्याने आमदार राहुल कुल यांच्याकडे या पुलांसाठी पाठपुरावा केला होता. या पुलाचे काम झाल्यामुळे दळणवळणासाठी फार मोठा फायदा होणार आहे.
-गणेश गायकवाड (मा.सदस्य ग्रा.पं.हिंगणीबेर्डी, काळेवाडी).