मुंबई : आईस्क्रीम ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. त्यामुळे आईस्क्रीम खाण्यासाठी वेळ पाहिली जात नाही. मात्र, आता आईस्क्रीमबाबत मुंबईतील मालाड परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जे ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. येथील एका महिलेने ऑनलाइन आईस्कीम ऑर्डर केली होती. ऑर्डर केलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला. महिलेने याबाबतची माहिती पोलीसांना दिली आहे.
Maharashtra | A woman found a piece of human finger inside an ice cream cone that was ordered online in the Malad area of Mumbai. After which the woman reached Malad police station. Malad police registered a case against the Yummo ice cream company and sent the ice cream for…
— ANI (@ANI) June 13, 2024
मलाड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ ते मानवी बोट FSL (फॉरेन्सिककडे) पाठवण्यात आले आहे. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करुन हे आईस्क्रीम तपासासाठी पुढे पाठवले आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
ओरलेम येथील रहिवासी ब्रेंडन सेराओ यांनी ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. सेराओ यांनी आईस्क्रीम खाल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येताच त्यांना त्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला. सुमारे 2 सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा पाहून महिलेला धक्का बसला. ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. पण त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती मलाड पोलीसांना दिली आहे.