अहमदनगर : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यात थेट लढत झाली. या लोकसभा निवडणुकीत इंग्रजी हा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय बनला होता. त्यावरु निलेशे लंके यांना प्रश्नही विचारले जात आहेत. अशातच आता निलेश लंकेंनी आपल्या भाषणात थेट इंग्रजी वाक्य बोलून अप्रत्यक्षपणे सुजय विखे यांना टोला लगावला आहे.
पवार इज द पावर..!#NileshLanke #विजयाचा_शरदचंद्र #रौप्यमहोत्सवी_राष्ट्रवादी #Ahilyanagar pic.twitter.com/YDmroCePmu
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 11, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 25 वा वर्धापन दिन सोहळा यंदा अहमदनगर येथे पार पडला. यावेळी शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली. त्यावेळी बोलताना निलेश लंकेंनी सुजय विखे पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करायचा नाही, असे म्हणत चक्क इंग्रजी वाक्य बोलून दाखवलं.
पवार इज द पॉवर : लंके
निलेश लंके म्हणाले, ”ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है. पवार साहेबांनी चेंडू टाकला आणि समोरच्यांचा त्रिफळा उडाला. नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांनो, भले भले थकले. पवार इज द पॉवर… असे इंग्रजी वाक्य बोलून निलेश लंकेंनी थेट सुजय विखेंवर निशाणा साधला. कारण, सुजय विखेंनी निवडणूक प्रचारादरम्यान लंकेंवर टीका करताना, त्यांना इंग्रजी बोलता येत नसल्यावरुन खिल्ली उडवली होती. तर, संसदेत जायचं म्हटल्यावर इंग्रजी बोलता आलं पाहिजे, असेही ते म्हणाले होते.
अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत यंदा इंग्रजी भाषा हा मुद्दा चांगलाच गाजल्याचं दिसून आलं. त्यातच राष्ट्रवादीच्या मेळाव्यात संधी साधत निलेश लंकेंनी टीकाकारांना थेट इंग्रजीतून टोला लगावला. तसेच, आता मुंबईवर झेंडा, तेही बहुमताने फडकणार आहे. विधानसभेवर पवार साहेबांचा झेंडा फडकणार आहे. विधानसभेच्या आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे मी साहेबांना शब्द देतो, बाराचे बारा आणून दाखवतो”, असे आव्हानही निलेश लंके यांनी स्वीकारलं आहे.
आमचं काम हटके
पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी विकेट काढतो, मी खासदार झालो तेव्हा अनेकांना विचारलं खरंच खासदार झालो का? पण साहेबांमुळे खासदार झालो. तुम्ही मला दिल्लीत नेऊन टाकले. जर संसदेत शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर संसद बंद पाडतो, आमचं काम हटके आहे. बघा हे आचारसंहिता आपल्याला कळत नाही. एकदा दिल्लीला जाऊन येतो, अंदाज घेऊन येतो कसा काय ते? निम्मा अंदाज घेऊन आलोय. आपण काम करणारा माणूस आहे. एकच ध्यानात ठेवा, पवार इज पॉवर आहे, असंही निलेश लंके यांनी यावेळी सांगितलं.