पुणे : पुण्यात शिक्षक पेशीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. उंड्री येथे एका सोसायटीमध्ये नेमण्यात आलेल्या फुटबॉल प्रशिक्षकाने एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोंढवा येथे ७ जून रोजी उंड्री येथील आंबेडकर चौक शेजारी घडला. याप्रकरणी फुटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकावर कोंडवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यश हेमंत जैन (वय-२५, रा. मारीएल स्पेशिओ, उंड्री) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्रीमध्ये एक प्रसिद्ध सोसायटी आहे. त्या सोसायटीत यश जैन हा फुटबॉल प्रशिक्षण देण्याचे काम करत होता. त्याच्याकडे एक १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी ही फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत होती. याचाच फायदा घेत त्याने तिच्याशी जवळीक साधली. तिला फोनवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्याशी लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मोहसिन पठाण करत आहेत.