जळगाव : शहरातील एका परिसरात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे.
७ जून रोजी सकाळच्या सुमारास मुलगी घरी असतांना कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने मुलीच्या अज्ञातपणाचा फायदा घेत तीला फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडीकस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियानी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तरी देखील ती मिळून न आल्याने अखेर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे..