बहुतांश लोकांच्या घरातील कुंडीत अगदी सहज पाहिला मिळणांर रोप म्हणजे कोरफड. ही कोरफड आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची मानली जाते. याचा सर्वाधिक फायदा हा केसांच्या आरोग्यासाठी होतो. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. याशिवाय, कोरफडीचा ताजा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते.
कोरफडीचा रस हा केस दाट आणि मजबूतीसाठी फायदेशीर मानला जातो. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच डोळे चुरचुरत असतील तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळू शकतो. डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्यांना लावल्याने फायदा होतो.
दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याधी असे आजार कमी होतात. कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, अॅसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन त्वचेला लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरकुत्या, पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात.