बारामती : मोबाईल ॲप वर प्रोव्हॅक्स ॲप डाऊनलोड करण्यास सांगून सुमारे आठ लाख पंचाहत्तर हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी मेरेलीना, नीलम सिंग, ओमकार बुधडा, सुखविंदर (सर्वांचे पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध भा.द.वी.कलम 420, 406, 34 अन्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतीक महेश कलवाडिया (रा .सायली हिल भिगवन रोड बारामती) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.4 मार्च 2024 ते दि.27 एप्रिल 2024 पर्यंत सदर फिर्यादीस मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यास सांगून वेळोवेळी त्यांच्या खात्यातून सुमारे आठ लाख पंचाहत्तर रूपये काढून दुसऱ्या बँकेचे खात्यात ट्रान्सफर केल्याप्रकरणी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकाते करीत आहेत.