पुणे : येथील सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथील प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर आज सकाळी (दि.6) एक अपघात झाला आहे. या अपघातात रेडी मिक्स सिमेंट टॅंकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला आहे.
धायरी आणि वडगावमध्ये सिमेंट कॉंक्रिट तयार करणारे सिमेंट प्लॉंट आहेत. येथे मोठा टॅंकर (एमएच 12 एस एक्स 9464) उताराच्या रस्त्यावरुन खाली जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यावेळी चालक अचानक गाडी वळाला असावा आणि अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. अपघातानंतर चालक पळून गेला. या घटनेवेळी बघ्यांची गर्दी झाली आहे.
वडगाव येथील प्रयेजा सिटीकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर जड वाहनांना म्हणजेच टॅंकर किंवा ट्रक यावर निर्बंध आहेत. तरीही संबंधित टॅंकर मालक या निर्बंधाकडे दुर्लक्ष करतात. असा बेपर्वाईमुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतो.