वैजापूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून केरळात दाखल झाला असून, महाराष्ट्रात ५ जूननंतर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी मक्याची मळणी सुरू केली आहे. मात्र, भाव नसल्याने शेतकरी विक्री करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मकाच्या कणसांची गंजी घातली होती. परंतु, पावसाळा तोंडावर आला आहे. काही ठिकाणी अधून-मधून पाऊस देखील पडत आहे. त्यातच धावडा परिसरात बुधवारी पहाटे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मक्याच्या मळणीची गडबड सुरू केली आहे.