पुणे : इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकांचे विद्यार्थ्यांना ११ जून रोजी वाटप केले जाणार आहे. विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक शाळांना सकाळी ११ वाजता गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत, तर शाळांकडून विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजल्यापासून गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे.
दहावीचा ऑनलाइन निकाल २७ मे रोजी जाहीर झाला. ऑनलाइन निकालामध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणांचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला. तर गुणपत्रिका ११ जूनपासून देण्यात येणार आहेत. इयत्ता अकरावी व इतर प्रवेश प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रत सादर करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा होती.