करिअर हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. हे करिअर साधारणत: वयाच्या 22-25 वर्षांपासून सुरु होते. मात्र, इतर असे काही पर्याय देखील आहेत की त्याला वयाची अट नाही. हे करिअर वयाच्या अगदी 50 वर्षांनंतरही करता येऊ शकणार आहे. याची माहिती आपण आज घेणार आहोत…
शिक्षकी पेशा हा एक ‘व्हाईट कॉलर’ जॉब समजला जातो. जर तुम्ही आधी शाळा-कॉलेजमध्ये शिकवले असेल, तर तुम्ही शिकवणी अर्थात क्लास घेऊन तुमच्या करिअरची चांगली सुरुवात सहज करू शकता. आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून ज्ञान देऊ शकता. यातून एक चांगली कमाईदेखील होऊ शकते.
सध्या कन्सल्टंट अर्थात सल्लागार हा शब्द अनेक ठिकाणी ऐकला-वाचला असेल जर तुम्ही कुटुंब, लग्न, मूल इत्यादी विषयांवर समुपदेशनाची पदवी घेतली तर तुम्ही उत्कृष्ट समुपदेशक बनू शकता आणि चांगली कमाई करू शकता. वयोमर्यादा नसलेल्या अनेक सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये समुपदेशकांना मागणी आहे.
तसेच 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 60 टक्के महिला रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात आपलं नशिब आजमावायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन कोर्स करूनही चांगली कमाई करू शकता. याचा फायदाही चांगला होऊ शकतो. या व्यवसायातही वयाची विशेष अशी अट नाही. त्यामुळे तुम्ही इथं देखील कमाई करू शकता.