सध्या लॅपटॉपसारखे इतर काही गॅजेट्स वापर वाढला आहे. लॅपटॉप जेव्हा आपण बाहेर जाताना वापरतो तेव्हा हमखास पडणारा प्रश्न म्हणजे त्याच्या चार्जिंगचा. कारच्या प्रवासादरम्यान लॅपटॉप कसा चार्ज करावा, असा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या बाजारात अनेक इलेट्रिक कारसुद्धा लाँच झाल्या आहेत. या गाड्यांना चार्जसुद्धा करावे लागते. तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
आता तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉप केवळ एका मिनिटात, तर इलेट्रिक कार फक्त दहा मिनिटांत चार्ज होणार आहे. सध्या एक नवीन तंत्रज्ञान शोधले आहे, जे लॅपटॉप, मोबाईल फक्त एका मिनिटात तर दहा मिनिटांत इलेट्रिक कार चार्ज करून देणार आहेत. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे की, विद्युतभारित कण सूक्ष्म छिद्रांच्या नेटवर्कमध्ये कसे फिरतात.
या विशेष अशा यशामुळे ‘सुपरकॅपेसिटर’सारख्या अधिक प्रमाणात ऊर्जा साठवणाऱ्या उपकरणांचा विकास होऊ शकतो. या टीमने शोधलेले हे तंत्रज्ञान केवळ वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये ऊर्जा साठवण्यासाठीच नाही, तर पॉवर ग्रीडसाठीही महत्त्वाचे आहे. जेथे चढ-उतार होणाऱ्या ऊर्जेचे जलद वितरण होते. सुपरकॅपॅसिटर, ऊर्जा साठवण उपकरणे त्यांच्या छिद्रांमध्ये आयन संग्रहावर अवलंबून असतात. याच्या माध्यमातून तुम्ही आपली गॅजेट्स अगदी सहजपणे चार्जिंग करू शकता.